Manasvi Choudhary
'दहीहंडी'हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत
यंदा ५ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा जोश आणि तरुणाईचा उत्साह हा पाहाण्यासारखा असतो.
दहीहंडी या उत्सवात हंडी फोडण्यासाठी जेव्हा उंचच उंच मानवी मनोरे, गोविदांचे थर रचले पण तुमच्या मनात हा प्रश्न आला आहे का की दहीहंडीला मानवी मनोरे रचून हंडी का फोडली जाते. ही परंपरा कशी सुरू झाली?
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा एक भाग आहे. श्रीकृष्ण लहान असताना अत्यंत खोडकर होते. त्यांना लोणी, माखन, दही हे पदार्थ खुप आवडायचे.
श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात जायचे तेव्हा गोपिकांच्या घरातील लोणी व दही घ्यायचे. यासाठी श्रीकृष्णापासून लोणी आणि दही वाचवण्यासाठी मडक्यात उंचावर टांगून ठेवायच्या.
मात्र खोडकर श्रीकृष्ण लोणी आणि दही मिळवण्यासाठी आपल्या सवंगड्यांसोबत एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून मानवी मनोरा रचायचे आणि त्यावर चढून उंचावर टांगलेली हंडी फोडायचे आणि लोणी खायचे.
श्रीकृष्णाची ही युक्ती केवळ खोडकरपणा नाही तर संघभावना आणि एकतेचे प्रतीक आहे. एकामेकांचा दुसऱ्यावर विश्वास ठेवून हा मनोरा त्यांनी यशस्वी केला असे मानले जाते.