Ankush Dhavre
छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्यदैवत आहेत.
महाराजांनी त्या काळी केलेल्या पराक्रमांची गाथा ऐकून आपल्याला आजही ऊर्जा मिळते.
महाराजांनी अनेक किल्ले काबिज केले.
त्यापैकीच एक किल्ला म्हणजे कल्याणमध्ये असलेला दुर्गाडी किल्ला.
छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले होते? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना.
छत्रपती शिवाजी महराजांनी 24 ऑक्टोबर 1654 रोजी आदिलशहाकडून कल्याण आणि भिवंडी ताब्यात घेतली
त्यावेळी त्यांनी किल्ले दुर्गाडीचा ताबा घेतला आणि कल्याण परिसराला आपल्या साम्राज्यात सामील केले.
कल्याणे हे महत्वाचे व्यापारी केंद्र होते, त्याचा वापर महाराजांनी आपल्या स्वराज्याचा लष्करी व आर्थिक बळकटीसाठी केला.