Siddhi Hande
मोमोज हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
तुम्ही घरी गव्हाच्या पीठापासून मोमोज बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला गव्हाचं आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे.
या पीठात मीठ आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
मोमोजचे सारण तयार करण्यासाठी सर्वात आधी कढईत तेल टाका. त्यात आलं -लसूण पेस्ट, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाका. हे सर्व परतून घ्या.
यानंतर गाजर आणि कोबी टाका. हे छान परतून घ्या. त्यात सोया सॉस, मीठ आणि मिरीपूठ टाकून नीट मिक्स करा.
यानंतर पीठाचे लहान गोळे करा. त्याच्या पुऱ्या लाटून घ्या.
यात मध्यमागी सारण भरा. त्यानंतर दोन्ही बाजूने दाबून मोमोजचा आकार द्या.
यानंतर मोमोज स्टीमरमध्ये हे वाफवून घ्या. यानंतर तुम्ही चटणीसह खाऊ शकतात.