अंडं खराब झालंय हे घरच्या घरी कसं ओळखाल?

Surabhi Jayashree Jagdish

अंडं

अंडं खराब झालं आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती पद्धती आहेत.

धोकादायक

खराब झालेलं अंडं खाल्ल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.

पाण्याची चाचणी

एका भांड्यात पाणी घ्या. अंडं पाण्यात सोडा. जर ते बुडालं तर ते ताजं आहे.

जुनं अंडं

जर अंडं पाण्याच्या मध्यभागी उभं राहिलं, तर ते जुनं आहे. जर ते पाण्यावर तरंगू लागलं, तर ते खराब झालं आहे.

वास घेऊन

अंडं फोडल्यावर वास घ्या. जर त्यातून सडलेला किंवा तीव्र वास आला, तर ते लगेच फेकून द्या.

रंग पाहा

अंडं फोडल्यावर, पिवळा भाग (योक) गोल आणि उंच असावा. जर तो सपाट दिसत असेल, तर ते जुनट आहे.

शेल (कवच) तपासा

अंड्याच्या कवचावर तडा किंवा छिद्र असेल तर ते वापरू नका, कारण त्यात जंतू गेले असण्याची शक्यता असते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा