Shreya Maskar
उन्हाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी आवर्जून गव्हाच्या पीठाचे लाडू खा.
गव्हाच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, गूळ, शेंगदाण्याचा कूट, तांदूळ, वेलची पावडर आणि काजू इत्यादी साहित्य लागते.
गव्हाच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
त्यानंतर पॅनमध्ये तूप टाकून त्यात तांदूळ आणि गव्हाचे पीठ टाकून परतून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट, गूळ, वेलची पावडर, काजू आणि बदामाचे काप घालून एकजीव करा.
पीठ थंड झाल्यावर त्याचे छान लाडू वळून घ्या.
गव्हाच्या पीठाचे लाडू तुम्ही एक आठवडा खाऊ शकता.
गव्हाच्या पीठाचे लाडू अधिक पौष्टिक बनवण्यासाठी यात ड्रायफ्रूट्स आणि बिया टाकू शकतात.