Shreya Maskar
नाश्त्यासाठी घरीच झटपट गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवा.
गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, बेसन, लाल तिखट, कसुरी मेथी, धणे पावडर, जिरे पावडर आणि हळद इत्यादी साहित्य लागते.
गव्हाच्या पिठाचा खाकरा बनवण्यासाठी एका ताटात गहू आणि बेसन पीठ मिक्स करा. यात कसुरी मेथी, लाल तिखट मसाला, हळद, मीठ, धणे पावडर आणि जिरे टाकून व्यवस्थित मिक्स करा.
यात तेल आणि पाणी टाकून कणिक मळून घ्या.
तयार पिठाचे छोटे गोळे करून पातळ चपाती लाटून घ्या.
तव्यावर तूप टाकून खारका मंद आचेवर भाजून घ्या.
गरमागरम चहासोबत गव्हाच्या पिठाचा खाकरा खा.
तुम्ही यात पेरी-पेरी मसाला देखील टाकू शकता.