Manasvi Choudhary
व्हॉट्सअपमध्ये रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. व्हॉट्सअप हे केवळ चॅटिंग अॅप नाही तर तर आपल्या भावना, फोटो आणि व्हिडिओ 'स्टेटस' द्वारे शेअर करण्यासाठी देखील लोकप्रिय आहे.
अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीला न कळवता किंवा त्याच्या 'Seen' लिस्टमध्ये आपले नाव न येऊ देता त्याचे स्टेटस पाहायचे असते.
व्हॉट्सॲपमध्येच एक अशी छुपी सेटिंग आहे, जी ऑन केल्यास तुम्ही कोणाचेही स्टेटस पाहू शकता. व्हॉट्सअपचे स्टेटस समोरच्याला न समजता तुम्ही पाहू शकता. यासाठी एक सोपी स्टेप्स तुम्हाला मोबाईलमध्ये करायची आहे.
व्हॉट्सअपमध्ये असे फिचर आहे ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला न कळता त्यांचा स्टेटस पाहू शकता.
हे करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करायचे आहे.
प्रायव्हसीच्या लिस्टमध्ये खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला चा एक प्रर्याय दिसेल ते ऑफ करा. व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये हा बदल केल्यास तुम्हाला कोणाचाही स्टेटस सहज पाहता येईल.
तुम्ही स्टेटस बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तींला सीन यादीमध्ये तुमचे नाव दिसणार नाही.
मात्र याचा एक परिणाम असा आहे की तुमचे स्टेटस कोणी पाहिला हे देखील तुम्हाला दिसणार नाही.