Dhanshri Shintre
व्हॉट्सअॅपने नवे थ्रेडेड मेसेज रिप्लाय फीचर आणले असून युजर्सना आता ग्रुप चॅटमध्ये सोपी संवाद सुविधा मिळेल.
वॅबेटेनइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचे थ्रेडेड रिप्लाय फीचर ग्रुप चॅटमध्ये मेसेजेस अधिक स्ट्रक्चर्ड आणि सोपे करेल.
वॅबेटेनइन्फोने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये दाखवले आहे की, थ्रेडेड रिप्लाय फीचरमुळे ग्रुप चॅटमधील महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत.
या फीचरमुळे ग्रुप चॅटमध्ये कोणत्या मेसेजवर किती जणांनी रिप्लाय दिला हे थ्रेडच्या स्वरूपात सहज पाहता येईल.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अनेक मेसेज एकाचवेळी येतात, त्यामुळे महत्त्वाचे संदेश दुर्लक्षित होतात; हे नवीन फीचर तो त्रास कमी करेल.
कंपनीने आणलेले थ्रेडेड रिप्लाय फीचर सध्या टेस्टिंगमध्ये असून, निवडक यूजर्सना याचा अनुभव घेण्याची संधी दिली आहे.
व्हॉट्सअॅप अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइटनुसार, थ्रेडेड रिप्लाय फीचर अँड्रॉइड तसेच आयओएस यूजर्ससाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
थ्रेडेड मेसेज रिप्लाय फीचरमुळे व्हॉट्सअॅप यूजर्सचा गोंधळ कमी होईल आणि कंपनी लवकरच याची स्थिर आवृत्ती आणणार आहे.