Sakshi Sunil Jadhav
Whatsapp आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. आपण याचा वापर दिवसरात्र करत असतो.
अनेकांचे महत्वाच्या कामाचे, बिझनेसचे, प्रायव्हेट चॅट यामध्ये असतात. आता याच चॅटींगमध्ये काही बदल होणार आहेत. पुढील माहितीत आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Whatsapp आता After Reading या नावाचं नवीन फिचर घेऊन येणार आहे. हे तुमच्या पर्सनल चॅटींगसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
तुम्हाला या फिचरमुळे तुम्हाला आलेले मेसेज वाचून झाल्यानंतर लगेचच गायब झालेले दिसणार आहेत. याने otp, पासवर्ड, पत्ता, व्हेरिफिकेशन कोड ही माहिती शेअर करणं सोपं होईल.
तुम्हाला यासाठी नवीन फिचर ऑन करावं लागणार आहे. त्यानंतर मॅसेज उघडल्यानंतर १५ मिनिटांचा काउंटडाऊन होईल आणि दोघांचेही चॅट आपोआप डिलीट होतील.
जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पाठवलेला मेसेज तुम्ही पाहिलाच नाही, तर २४ तासांनी तो आपोआप डिलीट होईल.
युजर्सना जर एखाद्या व्यक्तीला महत्वाची माहिती पाठवायची असेल तर जी त्यांची वैयक्तीक असेल तर त्यांच्यासाठी हे फिचर फायद्याचे ठरणार आहे.
आतापर्यंत अनेकांना चॅट स्वत: हून डिलीट करावे लागत होते. जर एखाद्या व्यक्तीला महत्वाची माहिती पाठवली तर समोरचा व्यक्ती त्याचा गैरवापर करणार नाही याची भीती वाटायची. आता हे टेन्शन संपलं आहे.
Whatsappचे हे नवे फिचर अद्याप युजर्सपर्यंत आलेले नाही. पण लवकरच तुम्हाला याचा वापर करता येणार आहे.