Sakshi Sunil Jadhav
तुम्ही हेल्दी आणि झटपट नाश्त्याचा पर्याय शोधत असाल तर मुगाचे कटलेट हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊयात सोपी रेसिपी.
1 कप भिजवलेले हिरवे मूग, 1 कप पोहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 इंच चिरलेले आले, चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे बेसन, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, कटलेट शेकण्यासाठी तेल इ.
हिरवे मूग 5 ते 6 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. भिजवलेले मूग पाणी काढून जाडसर वाटून घ्या.
पोहे हलक्या पाण्यात धुऊन गाळून घ्या. पॅनमध्ये बेसन मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
एका भांड्यात मूग पेस्ट, पोहे, बेसन, कांदा, मिरची, आले, कोथिंबीर घालून एकत्र करा.
जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. तयार मिश्रणाचे छोटे गोल कटलेट किंवा टिक्की बनवा.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करून कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. गरमागरम कटलेट हिरवी चटणी किंवा केचपसोबत सर्व्ह करा.