ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या काळात, व्हॉट्सॲप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
मित्रांशी चॅटिंग करणे असो की डॉक्युमेंट्स पाठवणे आपण महत्वाची कामे व्हॉट्सअॅप द्वारे करत असतो. यासोबतच व्हॉट्सॲप हॅक होण्याची भीतीही असते.
अलिकडेच व्हॉट्सॲप अकाउंट हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, जिथे लोकांनी आर्थिक फसवणूक केली जाते.
व्हॉट्सॲप हॅकिंगपासून बचावासाठी तुमच्या फोनमध्ये आजच ही एक सेटिंग करा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन हा एक सुरक्षा स्तर आहे. जे चालू केल्यानंतर, जेव्हा जेव्हा एखादे नवीन डिव्हाइस तुमच्या व्हॉट्सअॅप खात्यात लॉगिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला 6-अंकी पिन प्रविष्ट करावा लागतो.
प्रथम, व्हॉट्सअॅप अॅप उघडा. आता सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा नंतर अकाउंट सेक्शनमध्ये जा. येथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुम्हाला लक्षात राहील असा ६-अंकी पिन सेट करा. तुम्हाला हवे असल्यास, तुमचा ईमेल अॅड्रेस देखील अॅड करु शकता. यानंतर डन वर क्लिक करा. तुमचे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अॅक्टिव्ह होईल.