Sakshi Sunil Jadhav
काहींना नाश्त्यात रोज गरमा गरम आलू पराठा खाण्याची ईच्छा असते. पण हा पराठा रोज खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? याबाबत तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.
कार्ब्समुळे तात्काळ ऊर्जा मिळते आणि काही तास भूक लागत नाही. मात्र फार क्वचितच हा उपाय केलेला बरा आहे.
पराठा तेल, घी किंवा बटरमध्ये शेकवला जातो. या पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
रोज जास्त कार्ब्सचे सेवन केल्याने इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो. ज्यामुळे टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढतो.
तेलकट पराठ्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतो आणि हार्ट प्रॉब्लेम्सची शक्यता वाढते.
दही किंवा भाज्यांशिवाय खाल्ल्यास पचन मंदावते आणि ब्लड शुगरही जास्त वाढतो.
घी-बटर घालून खाल्ल्यास फॅटचे प्रमाण खूप वाढते, जे हृदय आणि वजन दोघांसाठी धोकादायक आहे.
तज्ज्ञ सांगतात की पराठा दही, सलाड, प्रोटीन किंवा फाइबरयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास तो थोडा हेल्दी होतो आणि ब्लड शुगर स्पाइक कमी होतो.