Gen Z नी 2025 मध्ये कोणत्या गोष्टी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या?

Surabhi Jayashree Jagdish

जेन झी

Gen Z तरूणांच्या गोष्टीच काही निराळ्या असतात. त्यांची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. अनेकांना जेन झी बद्दल जाणून घ्यायची फार इच्छा असते.

गुगल सर्च

पण तुम्ही कधी विचार केलाय की, जेन झी तरूणाई इंटरनेटवर काय सर्च करते? एका अहवालानुसार, जेन झी काय सर्च करत असतील याचा डेटा समोर आला आहे. यामध्ये जेन झी नेमकं काय सर्च करतात ते पाहूयात.

‘5201314’ कोड

हा सात-अंकी कोड खूप सर्च करण्यात आला. ह्यातील अर्थ लोकांना माहित नव्हता त्यामुळे अनेकांनी त्याचा अर्थ शोधला. हा शब्द सोशल मीडिया/कनेक्शन शब्द म्हणून गृहित घेतला गेला.

Ceasefire

तरूणांनी युद्ध आणि संघर्ष संदर्भातील माहिती शोधली.‘Ceasefire’ शब्दाचा अर्थ आणि उदाहरणे समजून घेण्यासाठी हा शब्द वापरला गेला.

मॉक ड्रिल आणि Mayday

आपत्कालीन शब्द आणि तयारीबद्दल तरूणांमध्ये जिज्ञासा होती. Mock Drill म्हणजे काय आणि Mayday चा नेमका अर्थ काय याची माहिती घेण्यात आली. हे सर्वाधिक करण्यात आले.

IPL आणि क्रिकेट ट्रेंड्स

२०२५ मध्ये IPL आणि महिला क्रिकेट (Women’s World Cup) सारख्या स्पोर्ट्स सर्च ट्रेंडमध्ये होते. तरूण मंडळी क्रिकेटबद्दल सतत अपडेट शोधत होती.

AI / टेक्नॉलॉजी ट्रेंडस

Google Gemini आणि AI-बद्ध सर्च्स बर्‍यापैकी वाढल्या. AI मॉडेल्स, टूल्स आणि नवीन तंत्रज्ञान तरूणांना जाणून घ्यायचे होते. ही ट्रेंड्स शहरातील युवा/टेक-सेव्ही युजर्समध्ये खूप लोकप्रिय.

Pookie

लोक सोशल मिडियावर पुकी या व्हायरल शब्दांचा अर्थ शोधत होते. ‘Pookie’ सारखे शब्दांचा अर्थही यावेळी शोधण्यात आला.

लबूबू

Labubu सारखे व्हायरल करॅक्टर २०२५ मध्ये तरूणांनी मोठ्या प्रमाणात सर्च केले. या ट्रेंडमध्ये तरुणाईमधील उत्सुकता दिसून आली

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा