ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक नाण्यांचा वापर केला जात असे.
शिवाजी राजांनी स्वराज्य प्रस्थापित होण्यासाठी 'होन' नाणी आणि 'शिवराई' नाणी वापरण्यात येत होती
ही नाणी सोन्याची आणि तांब्याची होती.
छत्रपती शिवरायांच्या काळा 'होन' हे सोन्याचं नाणं होतं, तर 'शिवराई' तांब्याचं नाणं होतं.
ही नाणी राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी, कर संकलनासाठी आणि व्यापारासाठी वापरली जात असत.
'होन' नाण्यांवर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, वृक्ष आणि खंडा यांसारखी चिन्हं कोरली होती.
'शिवराई' नाण्यांवर 'श्री राजा शिवछत्रपती' आणि 'छत्रपती' असे देवनागरी लिपीत लिहलेले होते.