Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास प्रत्येकाला आवडतं.
मिरचीचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला होता. त्यामुळे महाराजांच्या काळात जेवणामध्ये वापर केला जात नसे.
वरिष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी 'भवताल' या यूट्यूब चॅनलवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
मेक्सिकोच्या प्रदेशामध्ये प्राचीन काळात मिरचीची लागवड केली जायची. यानंतर पोर्तुगीज १५वे आणि १६वे शतकात दक्षिण अमेरिकेत पोहोचले.
त्यावेळी काही वस्तू त्यांनी अनेक इतर भागात पाठवल्या. त्यापैकी एक म्हणजे मिरची
शिवाजी महाराज्यांच्या काळात मिरची भारतात आली मात्र त्याचा जास्त वापर करण्यात आला नाही.
अशावेळी जेवणात तिखटपणा यावा म्हणून काळी मिरी तसंच लसूण आणि आल्याचा वापर केला जायचा.