Surabhi Jayashree Jagdish
कॅन्सर हा एक अतिशय प्राणघातक आजार आहे. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या लोकांना शरीराच्या अनेक भागांमध्ये वेदना जाणवू शकतात.
कॅन्सरमध्ये बहुतेक वेदना हाडं, नसा किंवा शरीराच्या इतर भागांवर ट्यूमरमुळे दाब पडल्याने होतात.
डोके, मान, पाठ, पोट, छाती, पाठीचा कणा, तोंड आणि घसा दुखू शकतो.
कॅन्सरच्या वेदना सौम्य, मध्यम किंवा तीव्र असू शकतात. कॅन्सरमुळे होणारं हाडांचं दुखणं सौम्य किंवा जास्त वाटू शकतं.
तुमच्या नसा किंवा पाठीच्या कण्यावर ट्यूमरचा ताण पडल्याने वेदना होतात.
यामध्ये क्रॅम्पिंग वेदना, स्नायू आणि त्वचेमध्ये वेदना होऊ शकतात.