Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेब हा भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट मानला जातो.
औरंगजेब एका हिंदू दासीच्या प्रेमात पडला होता. जेव्हा औरंगजेबाने या दासीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो बेशुद्ध पडला.
ही दासी होती हिराबाई. औरंगजेब हिराबाईला बुरहानपूरमझ्ये तिच्या मावशीच्या घरी भेटला.
औरंगजेब 35 वर्षांचा होता जेव्हा त्याला दख्खनला पाठवण्यात आलं होतं. याच मार्गावर मध्य प्रदेशात ताप्तीच्या काठावर बुरहानपूर आहे. औरंगजेबाची मावशी आणि काका मीर खलील खान-ए-जमान हे बुरहानपूरमध्ये राहत होते.
औरंगजेब आपल्या मावशीच्या घराच्या बागेत फिरत असताना काही दासीही तिथे फिरायला आल्या होत्या. हिराबाईंचाही त्यात समावेश होता.
हिराबाईंना सर्वजण प्रेमाने झैनाबादी म्हणत असे. झैनाबादीचे सौंदर्य पाहून औरंगजेब बेशुद्ध झाल्याचीही गोष्ट केली जाते.
आपल्या मावशी आणि काकांच्या मदतीने औरंगजेबाने हिराबाईंना 1653 मध्ये दौलताबाद येथे आणले.
या ठिकाणी देण्यात आलेली माहिती सामान्य गोष्टींवर आधारित आहे. आम्ही याची खातरजमा करत नाही.