Surabhi Jayashree Jagdish
१९९८ मध्ये लरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गूगलची सुरुवात केली होती. त्या वेळी ते एक रिसर्च प्रोजेक्ट होतं. पुढे जाऊन यामुळे जगात क्रांती घडली.
गूगलवर झालेल्या पहिल्या सर्चबाबत आजही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सुरुवातीला गूगलचा वापर केवळ सिस्टम तपासण्यासाठी केला जात होता. त्यामुळे पहिलं सर्च नेमकी काय होती हे स्पष्ट नाही.
असं मानलं जातं की, पहिलं सर्च एखाद्या टेकनिकल शब्दाशी किंवा अल्गोरिदमशी संबंधित होतं. काही लोकांचा दावा आहे की, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीशी संबंधित माहिती सर्च झाली होती. मात्र याबाबत ठोस पुरावा नाही.
त्या काळात गूगल सामान्य युझर्ससाठी नव्हतं. ते प्रामुख्याने डेव्हलपर्स आणि संशोधकांसाठी होतं. त्यामुळे त्याचा वापर मर्यादित होता
सुरुवातीच्या सर्चचा उद्देश निकाल किती अचूकता आणि वेग हे पाहण्यासाठी होता. गूगलचे परिणाम योग्य येतात का हे तपासलं जात होतं.
पहिल्या सर्च इंजिनमध्ये आजच्या प्रमाणे इमेज, व्हिडिओ किंवा न्यूज सर्च नव्हते. त्याचं इंटरफेस साधं आणि टेक्स्ट-आधारित होतं. त्यामुळे वापरणं सोपं होतं.
पहिलं सर्च नेमकी काय होतं हे स्पष्ट नसलं तरी तिच्यामुळे इंटरनेट जग बदललं. गुगलने माहिती शोधण्याची पद्धत कायमची बदलून टाकली. त्यामुळे ते जगातील सर्वात मोठा सर्च इंजिन बनला.