Dhanshri Shintre
सध्या ८२८ मीटर उंच असलेली दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते.
बुर्ज खलिफा येण्यापूर्वी जगातील सर्वोच्च इमारत कोणती होती, हे तुम्हाला जाणून घेणं नक्कीच रोचक ठरेल.
बहुधा तुम्ही या इमारतीचं नावही कधी ऐकलं नसेल, पण ती एकेकाळी जगातील सर्वोच्च होती.
बुर्ज खलिफा येण्यापूर्वी तैवानमधील तैपेई १०१ ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जायची.
२००४ मध्ये पूर्ण झालेली तैपेई १०१ ही २००९ पर्यंत जगातील सर्वोच्च इमारत म्हणून ओळखली जात होती.
बुर्ज खलिफामध्ये एकूण १६३ मजले आहेत, तर तैवानमधील तैपेई १०१ इमारतीत फक्त १०१ मजले आहेत.
तैवानच्या राजधानीतील तैपेई १०१ इमारत ५०९ मीटर उंच असून, बुर्ज खलिफा याची उंची ८२८ मीटर आहे.