Surabhi Jayashree Jagdish
शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना वाईट वागणूक देणाऱ्यांना किंवा अत्याचार करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जात असे.
महाराजांचे महिलांबाबतचे धोरण अतिशय आदराचे होते आणि त्यांच्या राज्यात महिलांची सुरक्षा सर्वोच्च मानली जात असे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना दिली जाणारी सर्वात कठोर शिक्षा 'चौरंग' होती.
या शिक्षेमध्ये आरोपीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले जात. यामागे उद्देश हा होता की, अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर इतरांसाठी एक उदाहरण म्हणून ठेवलं जावं.
काही प्रकरणांमध्ये, विशेषतः ज्यावेळी गैरवर्तन गंभीर स्वरूपाचं असायचं तेव्हा तेव्हा डोळे काढण्याची शिक्षा दिली जात असे.
अत्यंत गंभीर गुन्ह्यांसाठी, जसं की बलात्कारासारख्या कृत्यांसाठी मृत्यूदंड देखील दिला जात असे.
शिवाजी महाराजांनी सैन्याला सक्त आदेश दिले होते की, कोणत्याही मोहिमेवर असताना किंवा युद्धात शत्रूपक्षातील स्त्रियांनाही कोणताही त्रास देऊ नये, त्यांना कैद करू नये, उलट त्यांचा सन्मान करावा.