Surabhi Jayashree Jagdish
विवाह पंचमीच्या दिवशी राजा जनकांनी आयोजित केलेल्या स्वयंवरात भगवान रामांनी धनुष्य उचललं आणि सीता आणि राम विवाहबंधनात अडकले.
हा प्रसंग अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मानला जातो. चला जाणून घेऊया त्या धनुष्याचे नाव काय होते.
माता सीतेच्या स्वयंवरात ठेवले गेलेलं धनुष्य ‘पिनाक’ नावाचं होतं. जे भगवान शंकरांचं धनुष्य होतं. हे धनुष्य अत्यंत शक्तिशाली होते आणि भगवान श्रीरामांनी ते सहजपणे तोडले होते.
राजा जनकांनी अट ठेवली होती की, जो पुरुष हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशी सीतेचा विवाह केला जाणार आहे. ही अट अत्यंत कठीण होती आणि त्यामुळेच अनेक बलाढ्य राजे अपयशी ठरले. ही अट रामाच्या शौर्याची कसोटी ठरली.
अनेक बलशाली राजे हे धनुष्य उचलण्यात अपयशी ठरले. मात्र श्रीरामांनी ते सहजतेने उचलून त्याचे दोन तुकडे केले. या घटनेने उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केले.
पिनाक धनुष्याचे निर्माण भगवान विश्वकर्मांनी एका दैवी बांबूपासून केलं होतं. हे बांबू त्यांना ब्रह्मदेवांनी दिलं होतं. भगवान शंकरांनी हे धनुष्य त्रिपुर संहारासाठी वापरलं होतं.
नंतर भगवान शंकरांनी हे धनुष्य परशुरामांना दिलं आणि त्यांनी ते राजा जनकांचे पूर्वज देवरथ यांना दिलं. अशीही मान्यता आहे की, हे धनुष्य इंद्रदेवांनी राजा जनकांना भेट म्हणून दिलं होतं. त्यामुळे या धनुष्याला दैवी महत्त्व प्राप्त झाले होते.
पौराणिक मान्यतेनुसार, पिनाक धनुष्याचं वजन सुमारे १०० किलो होतं. हे धनुष्य अत्यंत जड आणि सामान्य माणसाच्या उंचीपेक्षा अधिक लांब होते. त्यामुळे सामान्य मनुष्य ते उचलूही शकत नव्हता.