ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोठमोठ्या लढाया जिंकल्या. त्यांच्याशी संबधित महान अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून ऊर अभिमानाने भरुन येतो.
छत्रपती शिवरायांच्या लढायांमध्ये त्यांच्या घोड्यांचाही विशेष आणि महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाचं महत्वपूर्ण योगदानाप्रमाणे त्यांचे नावही खास होते.
काही इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवरायांच्या अश्वाचं नावं विश्वास होतं. पण काही इतिहासकारांचे मत याबाबतीत वेगळं आहे.
इतिहासाचे सखोल ज्ञान असणाऱ्या इतिहासकारांत्या मते, त्यांच्या अश्वाचं नाव कृष्णा होतं.
इतिहासातील माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक अश्वं होते. त्यांची नावे विश्वास, मोती, तुरंगी, रणवीर, इंद्रायणी आणि गजरा अशी होती.