Sajuk Tupatil Sheera: शिवजयंतीनिमित्त बनवा खमंग लुसलुशीत साजूक तुपातला शिरा, जिभेवर ठेवताच विरघळेल, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवजयंती

१९ फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने प्रत्येकाच्या घरात काही विशेष पदार्थ बनवले जातात.

sheera | saam tv

शिरा

प्रत्येक सणाला आपण काही तरी गोड पदार्थ बनवतो. मग या शिवजयंतीला घरी बनवा खुसखुशीत साजूक तुपातील शिरा, रेसिपी वाचा.

sheera | google

शिरासाठी लागणारे साहित्य

1/2 वाटी रवा,1/2 वाटी साखर, 4 कप दूध, 2 चमचे साजूक तूप, वेलची पूड, ड्राय फ्रुट्स

sheera | google

रवा भाजून घ्या

एक पॅनमध्ये तूप घालून गरम करा. तुपामध्ये रवा चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. ड्रायफ्रूटस देखील तुपात परतून घ्या.

sheera | google

दूध गरम करा

रवा भाजत असताना दुसऱ्या बाजूला दुध गरम करायला ठेवा. रवा चांगला खरपूस भाजल्यावर यामध्ये गरम केले दूध घाला. आणि मिश्रण एकजीव करुन चांगले परतून घ्या. यामध्ये वेलची पूड घाला.

sheera | yandex

साखर मिक्स करा

आता यामध्ये साखर घाला आणि चांगले परतून घ्या. पॅनवर झाकण ठेवून सात-आठ मिनिटानंतर साखर विरघळेपर्यंत मिश्रण मंद आचेवर चांगले पतून घ्या आणि जळणार नाही याची काळजी घ्या.

sheera | google

साजूक तुपातला शिरा तयार आहे

मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅस बंद आणि ड्राय फ्रुट्स घालून सर्व्ह करा. मऊ, लुसलुशीत शिरा तयार आहे.

sheera | google

NEXT: पती-पत्नीच्या ४ सवयी वैवाहिक आयुष्य करतात उद्धवस्त, काय सांगते चाणक्य नीती?

Husband Wife Relationship | Ai Generator
येथे क्लिक करा