ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीच्या नात्यात एकमेकांच्या प्रति आदर सन्मान आणि प्रेम असणे गरजेचे असते.
चाणक्य यांनी वैयक्तिक जीवन, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, मैत्री, शत्रुत्व इत्यादी जीवनाच्या विविध पैलूंबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत.
चाणक्य यांनी पती पत्नीच्या सुखी संसारासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य नीतीच्या मते, पती पत्नीने या चार गोष्टी अजिबात करु नये अन्यथा सुखी संसार उद्धवस्त होऊ शकतो.
चाणक्य नीतीनुसार, पती-पत्नीचे नाते एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. हे नाते टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांबद्दल आदर असणे आवश्यक आहे.
पती-पत्नी हे सुख-दु:खाचे भागीदार असतात आणि त्यासाठी त्यांना एकमेकांशी समन्वयाने राहावे लागते. यासाठी एकमेकांशी बोलणे खूप महत्वाचे आहे. अन्रयथा गैरसमज वाढतात.
पती-पत्नीमधील नात्यात राग हानिकारक ठरतो. जेव्हा पती किंवा पत्नी रागावतात तेव्हा त्याला किंवा तिला त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे हे समजत नाही.
पती-पत्नीमधील नाते खूप नाजूक असते. म्हणून जोडीदारापासून कधीही सत्य लपवू नये. कालांतराने सत्य उघड झाले तर जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ लागेल आणि नात्यात कटुता निर्माण होईल.