ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा शासक होता. त्याला मुघल साम्राज्याचा सर्वात क्रूर शासक मानला जात होता. औरंगजेबाने १६५८ ते १७०७ पर्यंत राज्य केले.
डेक्कनहून दिल्लीला परतत असताना वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. औरंगजेबची शेवटची इच्छा काय होती, वाचा.
असे म्हटले जाते की,मृत्यूपूर्वी औरंगजेबाने त्याचा मुलगा आझम शाह याला एक पत्र लिहिले होते ज्यामध्ये त्याने त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
पत्रात लिहिले होते की त्याने टोप्या शिवून ४ आणि २ आणे कमावले आहेत. त्या पैशातून त्याचे अंतिम संस्कार करावे.
कुराण लिहिण्यापासून मिळणारे ३०५ रुपये काझी आणि गरिबांमध्ये वाटून द्यावेत, असेही पत्रात म्हटले होते. औरंगजेबाला त्याच्या मृत्युनंतर शाही तिजोरीचा वापर अंत्यसंस्काराशी संबंधित कोणत्याही कामासाठी करायचा नव्हता.
औरंगजेबाने आपल्या कबरीवर कोणतीही भव्य इमारत बांधू नये अशी इच्छा व्यक्त केली होती.
मृत्युच्या ठिकाणीच दफन करावे अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाला औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे पुरण्यात आले.