ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनी प्लांटची पाने पिवळी पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु यामागचे मुख्य कारण कोणते. जाणून घ्या.
जर मनी प्लांटला जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला किंवा अजिबात सूर्यप्रकाश नाही मिळाला तरही याची पाने पिवळी पडू शकतात.
कधीकधी बुरशी किंवा किटकांमुळे देखील मनी प्लांटची पाने पिवळी पडतात.
जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स किंवा उर्जेचा अभाव असल्यास पाने पिवळी पडतात.
झाडाला अतिप्रमाणात पाणी घातल्याने देखील पाने पिवळी पडू शकतात.
झाडांना जर सूर्यप्रकाश किंवा उजेड नाही मिळाला. तसेच ते अधिक काळ जर अंधारात असतील तरीही पाने पिवळी पडू शकतात.
जुनी झालेली पाने आपोआप पिवळी पडून गळतात.तर त्या जागी नवीन पाने फुटतात.