Haldi Kumkum gift ideas: यंदा संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी काय वाण देणार? या आयडिया ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

हळदी-कुंकू

संक्रांतीचा हळदी-कुंकू हा सण सौख्य, समृद्धी आणि नात्यांची गोडी वाढवणारा मानला जातो. वाण देताना उपयोगी, टिकाऊ आणि सन्मान राखणारं साहित्य देण्याची परंपरा आहे.

स्वस्तात मस्त वाण

यंदा महिलांना रोजच्या वापरात येईल असं आणि थोडं वेगळं वाण दिलं हटके वाटतं. कमी खर्चात, पण मनापासून दिलेलं वाणच खऱ्या अर्थानं लक्षात राहतं. यंदा तुम्ही काय वाण देऊ शकता ते पाहूयात

तिळगुळ व ड्रायफ्रूट्स पॅक

संक्रांतीचा मुख्य गोडवा म्हणजे तिळगुळ. लहान डब्यात तिळगुळ, शेंगदाणे किंवा मनुका देता येतात. आरोग्यासाठीही हा पर्याय उत्तम असतो.

चमचा/पळी/डबा

स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू नेहमीच आवडतात. स्टील किंवा प्लास्टिकचे छोटे डबे, पळी, चाळणी देता येते. दररोज वापरात येईल असं वाण ठरतं.

कृत्रिम फुलांची वेणी

संक्रांतीला महिलांना सजायला आवडतं. ताजे किंवा कृत्रिम गजरे, वेण्या देता येतात. थोडं वेगळं आणि सुंदर वाण ठरतं.

बांगड्या किंवा टिकली सेट

हळदी-कुंकवात बांगड्यांना विशेष स्थान आहे. रंगीत बांगड्या किंवा टिकलींचा छोटा सेट देता येतो. कमी खर्चात आकर्षक पर्याय आहे.

कापडी पिशवी किंवा रुमाल

प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी उपयुक्त ठरते. भाजी-बाजार किंवा रोजच्या वापरासाठी उपयोगी पडते. पर्यावरणपूरक संदेशही जातो.

छोटं रोप

घरात लावण्यासाठी छोटं रोप देणं शुभ मानलं जातं. तुळस, मनीप्लांट किंवा सक्युलेंट देता येईल. सणाची आठवण दीर्घकाळ टिकते.

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा