Sakshi Sunil Jadhav
शरीरात हाडे हा महत्वाचा भाग मानला जातो. जर हाडे कमकुवत झाली तर चालणे कठीण होते.
जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला हाडांचे दुखणे सुरु होते.
पुढे आपण कॅल्शियमची कमतरता असल्यास कोणते पदार्थ खाऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात दूध, दही, पनीर खाऊ शकता. त्याने तुम्हाला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळेल.
पांढरे तीळ नेहमी किमान १ चमचा खावेत. त्याने तुमच्या शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळेल.
आहारात जमतील तितक्या हिरव्या भाज्यांचा समावेश करु शकता.
काजू, बदाम, मखाणे हे पदार्थ शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण मिळत नाही.