Saam Tv
ओट्समध्ये कार्बोहायड्रेटेस भरपूर प्रमाणात असतात. जे दिर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
केळी हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम नसा आणि स्नायुंना मजबूत करते. वर्कआऊट करण्यापूर्वी २ केळी खाणे उत्तम
अंड्यामध्ये प्रथिने आणि अमिनो अॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
सुका मेव्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वर्कआऊट करण्यापूर्वी सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो.
पोहा उपमा खाण्याची इच्छा असेल तर व्यायाम करण्याअगोदर १ ते २ तासाआधी पोहा किंवा उपमा खाऊ शकता.
दूध किंवा दह्यामध्ये केळी किंवा बेरी मिक्स करून बनवलेली फ्रुट्स स्मूदी पौष्टिक आणि लवकर पचते.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.