Manasvi Choudhary
सकाळी उठल्यानंतर आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.
सकाळी योग्य आहार घेतल्याने संपूर्ण दिवसभर शरीरात एनर्जी राहते मूड फ्रेश राहतो.
आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया.
दिवसाची सुरुवात १-२ ग्लास कोमट पाण्याने केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
रात्रभर भिजवलेल्या बदामाची साल काढून खाल्ल्यास बुद्धी तल्लख होते आणि शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात.
पपई रिकाम्या पोटी खाणे पचनासाठी उत्तम आहे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने 'ॲसिडिटी' वाढते आणि पचन बिघडू शकते. नाश्ता केल्यानंतर चहा पिणे योग्य आहे.
जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाची जळजळ होऊ शकते आणि गॅसचा त्रास होतो. Morning Foods
सकाळी सर्वात आधी खूप गोड खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे लवकर थकवा जाणवू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.