Manasvi Choudhary
लांब, दाट आणि चमकदार केसांसाठी महागड्या ट्रिंटमेंटपेक्षा घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहेत.
केसांची वाढ वेगाने होण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
कांदा हा केसांसाठी फायदेशीर आहे. कांद्यामधील सल्फरमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि नवीन केस येतात
कांदा किसून त्याचा रस काढा. कापसाच्या सहाय्याने हा रस केसांच्या मुळांना लावा.
केसांना कढीपत्ता लावल्याने केसांना नैसर्गिक काळा रंग येतो खोबरेल तेलात मुठभर कढीपत्ता टाकून तेल गरम करा आणि केसांच्या मुळांना लावा
कोरफड केसांना लावल्याने केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते. ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये तुम्ही एरंडेल तेल मिक्स करा
आहारात अंडी, पालेभाज्या, आवळा आणि सुकामेवा यांचा समावेश करा. केसांच्या वाढीसाठी प्रोटीन आणि लोह आवश्यक असते.