Manasvi Choudhary
आयुर्वेदानुसार, सकाळची वेळ अत्यंत महत्वाची असते. तुम्ही सकाळची सुरूवात कशी करता यावर तुमच्या दिवसाचे वेळापत्रक ठरलेले असते.
सकाळी लवकर उठल्याने शरीराला फायदा होतो. सकाळची हवा शरीरासाठी चांगली असते.
सकाळी उठल्याबरोबर १-२ ग्लास कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
सकाळच्या कोवळ्या उन्हांत बसा यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.
सकाळी योगा केल्याने शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यासा मदते व दिवसभर मूड फ्रेश राहतो.
तुम्ही संपूर्ण दिवसभरात काय करणार आहात? याचे नियोजन करा
उठल्याबरोबर सोशल मीडिया, ई-मेल किंवा बातम्या पाहू नका. यामुळे मेंदूवर ताण येतो
रिकाम्या पोटी कडक चहा किंवा कॉफी पिणे टाळा. यामुळे छातीत जळजळ व पित्त होते
सूर्योदयानंतर खूप वेळ झोपल्याने शरीरात 'तमोगुण' वाढतो, ज्यामुळे दिवसभर सुस्ती जाणवते.