Manasvi Choudhary
सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिन्ही वेळी चहा प्यायला सर्वानाच आवडतो. चहा प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो मूड फ्रेश होतो.
मात्र हॉटेलसारखा चहा घरी होत नाही. हॉटेलसारखा स्पेशल चहा बनवण्याची रेसिपी आज आपण जाणून घेऊया.
चहा मसाला खरी चहाची चव वाढवतो. चहा बनवण्यासाठी लागणारा मसाला तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
चहा मसाला बनवण्यासाठी सुठं, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, बडीशेप, जायफळ हे साहित्य घ्या.
चहा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढईमध्ये वेलची, लवंग, मिरी, दालचिनी आणि बडीशेप टाका.
संपूर्ण मिश्रण चांगले गरम करून घ्या मसाले जास्त भाजू नका.
सुंठ आण जायफळ याचे बारीक तुकडे करा. भाजलेले सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाले, सुंठ आणि जायफळ एकत्र करून बारीक पावडर करून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी चहा मसाला तयार होईल.