ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तळलेल्या पदार्थांचे सेवन कमीत कमी केलं पहिजेल असा तज्ञ सल्ला देतात.
पण अनेकांना पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा गरम पुऱ्यांचा अस्वाद घेण्यास आवडतो.
अनेकांना प्रश्न पडतो तळून झाल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं? चला जाणून घेऊया.
सध्या तेलांचे भाव इतके वाढले आहेत की ते टकूनही देऊ शकत नाहीत.
एकदा वापरलेलं तेल वारंवार वापरल्यामुळे तुम्हाला विष बाधा होऊ शकते. वापरलेलं तेल तुम्ही पोळ्यांना किंवा थालिपीठांवर वापरु शकता.
परंतु या तेलाचा वापर ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त वापरु नये.
पावसाळ्यात घरातील दरवाजे ड्रॉवर घट्ट होतात वापरलेल्या तेलाचा वापर लाकडी फर्निचरला पॉलिश करायला वापरु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.