ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वातावरणातील बदलाव्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे केसगळती हे एक प्रमुख कारण ठरु शकते.
तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देते.
केसांची निगा राखण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपल्बध आहेत. मात्र,घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही केसांची उत्तम निगा राखू शकता.
केसांसाठी तुरटी आणि नारळाचं तेल एकत्र करुन वापरु शकतो. जे केसांची निगा तर राखतातच पण त्यांची वाढही चांगली होते.
आपल्याकडे तुरटीची पावडर असेल तर , एक मग पाण्यात ३ चमचे तुरटी पावडर मिक्स करुन स्काल्पवर लावा. त्यानंतर केस धुवा . याने कोड्यांची समस्या ही दूर होईल.
केसांना तुरटीचा वापर करताना ती एकदम थोड्या प्रमाणातच त्याचा वापर करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत