Manasvi Choudhary
घरी अनेकदा इडली बनवल्यानंतर ती उरते. पण शिळी इडली फेकून देण्याची आता गरज नाही. अवघ्या १० मिनिटांत तुम्ही या शिळ्या इडलीपासून एक अतिशय चमचमीत, खमंग आणि रेस्टॉरंट स्टाईल नाश्ता बनवू शकता.
'मसाला फ्राय इडली' तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच इडली खायला आवडेल.
मसाला इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इडली, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, हळद, मसाला, सांबर मसाला, मीठ, कोथिंबीर.
सर्वातआधी, इडलीचे लहान लहान तुकडे करून घ्या. पण इडली थंड झाली आहे की नाही याची खात्री करा कारण गरम इडली फुटू शकते.
गॅसवर पॅनमध्ये कढईमध्ये गरम तेलमध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेल्या हिरवी मिरची आणि कढीपत्ता याची एकत्र फोडणी द्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. गॅस फास्ट करून संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या.
मिश्रण शिजले की त्यात हळद, लाल मसाला, सांबर मसाला मिक्स करा. मसाले करपणार नाही याची काळजी घ्या.
नंतर या मिश्रणात इडलीचे तुकडे मिक्स करा. इडली मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्या म्हणजे मसाले इडलीत मिक्स होतील.
मध्यम आचेवर संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. मिश्रण शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून कोथिंबीर घाला म्हणजे घरच्या घरी चटपटीत नाश्ता तयार होईल.