Manasvi Choudhary
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरात 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढू लागला आहे.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल आणि बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेववायचे असेल, तर तुमच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी ऐवजी हेल्दी ड्रिंक्सने होणे महत्वाचे आहे.
आल्यामधील जिंजरॉल्स शरीरातील दाह कमी करतात. आले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दररोज २,३ कप ग्रीन टी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.
जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेला हा चहा केवळ दिसायलाच सुंदर नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. माहितीनुसार, सहा आठवडे तुम्ही दररोज जास्वंदी चहा प्यायल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कॅमोमाइल चहा सामान्यत: झोप आणि आरामसाठी प्यायला जातो पण तो हृदयासाठी उत्तम आहे. त्यातील अपिजेनिनसारखे अँटीऑक्सिडंट्साठी दाह कमी करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.