Manasvi Choudhary
लाडक्या पत्नीला खूश ठेवण्यासाठी छानसे सरप्राईज गिफ्ट तुम्ही देऊ शकता. आजकाल महिला जड आणि मोठे दागिने घालण्याऐवजी युनिक आणि स्टायलिश दागिने घालणे पंसत करतात.
यासाठी आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट युनिक मंगळसूत्र ब्रेसलेटचे पॅटर्न्स सांगणार आहोत.
डायमंड हार्ट पेंडन्ट या डिझाईनच्या ब्रेसलेटमध्ये सोन्याचे किंवा डायमंड हार्टशेपचे लॉकेट असते आणि दोन्ही बाजूला काळ्या मोत्यांची छोटी सर असते.
'इन्फिनिटी' डिझाईन असलेले लहानसे पेंडन्ट ब्रेसलेट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही ते देखील निवडू शकता.
वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी आजकाल 'इविल आय' पॅटर्न खूप लोकप्रिय आहे.
फ्लोरल डिझाईनचे ब्रेसलेट अतिशय क्लासिक आणि ट्रेडिशनल वाटते जे वेस्टर्न आणि एथनिक लूक दोन्हीही छान दिसते.