Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला की आरोग्यावर परिणाम होतो.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमरता भासणे यामुळे डिहायड्रेशनचा त्रास, चक्कर येणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे यासांरख्या समस्या उद्भवतात.
उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी झाले की रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण घटते, ज्यामुळे रक्तातील साखरेची प्रमाण अचानक वाढू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसाता जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. पाण्यात लिंबू पिळून किंवा थोडे जिरे टाकून प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
उन्हाळ्यात आंबा , कलिंगड, द्राक्ष या हंगामी फळांचे सेवन केले जाते. या फळांमध्ये शुगर लेव्हले अधिक असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
पॅक केलेले फळांचे रस, कोल्ड्रिंक्स किंवा ऊसाचा रस पिणे टाळावे त्याऐवजी तुम्ही मसाला ताक शहाळ्याचे पाणी किंवा सत्तूचे सरबत प्या हे शरीराला थंड ठेवतात