Sakshi Sunil Jadhav
ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा वाढल्याने दोन्हीगोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा सतत त्रास होत असतो. त्यांनी खाण्यावर आणि लाईफस्टाइलवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
तुमचं जर डोकं दुखत असेल, अशक्तपणा, नाकातून रक्त, छातीत दुखणे, सतत चिडचिड होत असेल तर ही लक्षणे हाय ब्लड प्रेशरची आहेत.
तुम्ही अशा वेळेस काही सोपे उपाय करून ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता.
सगळ्यात आधी जास्त पाण्याचे सेवन करणे योग्य ठरेल.
डोक्यावर थंड पाणी ओता. त्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
जेवणात तिखट आणि मीठाचे कमी प्रमाणात सेवन करणे.
फळं, सॅलेड, सूप, तसेच सगळ्या भाज्यांचे सेवन करणे.
तसेच कोणतेही व्यसन करू नये त्याने तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.