Sakshi Sunil Jadhav
भुवया (Eyebrows) चेहर्याचं सौंदर्य वाढवतात. सध्या ट्रेंडमध्ये जाड आणि नैसर्गिक भुवया आहेत.
अनेक वेळा थ्रेडिंग, मेकअप किंवा हार्मोनल बदलांमुळे आयब्रो विरळ होतात. पण घरच्या घरी काही नैसर्गिक तेलांच्या वापराने त्या पुन्हा घनदाट करता येतात.
आयब्रो वाढवण्यासाठी सर्वात लोकप्रिय तेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने लावा आणि सकाळी धुवा.
प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी भरपूर. केसांची मुळे मजबूत करते आणि कोरडेपणा कमी करते.
व्हिटॅमिन E मुळे आयब्रो मऊ आणि चमकदार दिसतात. त्यामुळे तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर नियमित करावा.
केसांच्या वाढीसाठी आवश्यक फॅटी ऍसिड्स देते. रोज लावल्यास काही दिवसांत फरक दिसतो.
नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. नवीन केसांची वाढ वाढवते. त्यामुळे हा एक सोपा नैसर्गिक उपाय सगळ्यांनी फॉलो करायचा आहे.
व्हॅसलिन आयब्रोला ओलावा देते आणि केस गळणे कमी करते. हा स्वस्तात मस्त उपाय आहे.