Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या गृहीणींची स्वयंपाक करताना प्रचंड घाई होत असते.
महिला त्यासाठी कणीक आदल्या रात्री मळून फ्रीजमध्ये स्टोअर करतात.
बऱ्याच वेळेस कणीक काळी पडते किंवा चपाती वातड होते.
पुढे आम्ही यासाठी सोपा उपाय सांगणार आहोत. त्याने तुम्हाला मऊ लुसलुशीत आणि चांगल्या कणकेच्या पोळ्या खायला मिळतील.
फ्रीजमध्ये कणीक ठेवताना कणकेवर तेल लावायला विसरू नका.
कणीक फ्रीजमध्ये ठेवण्यापुर्वी एक ताट घ्या. त्यामध्ये पाणी घ्या आणि त्यावर कणकेचा डबा ठेवा. त्याने कणीक ताजे राहते.
मळलेली कणीक एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा.
जर दीर्घकाळासाठी ठेवत असाल, तर दररोज थोडा वेळ बाहेर काढून मळून पुन्हा स्टोअर करा.