Saam Tv
उन्हाळा आला की साप चावण्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो.
भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड (बीएसव्ही) च्या माहितीनुसार साप चावण्याची आकडेवारी तब्बल ४.५ दशलक्षपर्यंत पोहोचली आहे.
कॉमन क्रेट, इंडियन कोब्रा, रसेल्स वाइपर आणि सॉ स्केल्ड वायपर या सापाच्या जाती अधिक तीव्र असतात.
साप चावल्याने विष शरीरात जातं आणि रक्तस्त्राव होतो, ह्दयविकाराचा झटका येतो, मुत्रपिंडाला दुखापत आणि मृत्यू अशा अनेक प्रकारचे परिणाम शरीरावर होतात.
कधीही साप असो वा विंचू त्वरित डॉक्टरांकडे धाव घेणे महत्वाचे आहे.
साप चावल्यास जास्त हालचाली करू नका त्याने तुमच्या शरीरातील विष ह्दयापर्यंत पोहोचणार नाही.
साप चावल्याने अंगावर सुज येवू शकते. त्यामुळे घट्ट कपडे आणि दागिने टाळा.
शरीरात विष पसरू नये म्हणून मोठ्याने हातवारे करणे टाळा.
साप चावलेल्या भागातील जखम धुवू नका, त्या भागाला घट्ट बांधू नका, स्वतः औषधोपचार करू नका.