ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज ३१ ऑगस्ट रोजी गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आहे.
आज घराघरात सोन्याच्या पावलांनी गौराईचे आगमन केले जाते.
हा सण महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील स्त्रिया अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी यादिवशी व्रत करतात.
गौरी पूजन करताना कोणत्या नक्षत्रावेळी काय करावे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सूर्योदयापासून सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावे.
दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावं.
तिसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटे या वेळेपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन करावं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.