Manasvi Choudhary
यंदा रविवार म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन आहे.
गौरी आवाहन शुभमुहूर्त सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे.
सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे.
गौरी पूजन हे महाशक्तीचं पूजन म्हटलं जातं. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन, पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य आणि सुख-संपत्ती येते असं म्हणतात.
सुवासिनी महिलांसाठी गौरी या सणाचे विशेष महत्व आहे.
गौरी या सणाला सुवासिनी महिला व नवविवाहित महिला ओवसा करतात.
गौरी म्हणजे आदीशक्ती, मातेची खणानारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतला जातो.
भरलेले सुप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते. हे सौभाग्याचे लक्षण आहे.