ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक घरी झाडू वापरण्यात येतो.
जेव्हा नवीन झाडू आणतो तेव्हा सर्वांना एक समस्या जाणवते ती म्हणजे झाडूमधून निघणारा भुसा.
नवीन झाडूने झाडू मारताना घरभर भुसा पसरतो.
चला तर पाहूयात भुसा काढण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरता येईल.
बाजारातून नवीन झाडू हा प्लास्टिकच्या कव्हरमध्ये असतो, तेव्हाच झाडू सगळ्या बाजूंनी झाडा,यामुळे भूसा कव्हरमध्येच पडेल.
नवीन झाडू आणल्यानंतर तो काही तासांसाठी कडक उन्हात ठेवून द्या. उन्हात झाडू ठेवल्याने भुसा सुकतो ते झाल्यांनंतर झाडू जोरात झाडून घ्या.
नवीन झाडू आणल्यानंतर एका मोठा ब्रश झाडूवरुन फिरवा, असे केल्याने झाडूतून भूसा पडेल.
या ट्रिकच्या मदतीने तु्मचे काम नक्कीच कमी होईल.