Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात देवदेवतांच्या मूर्तीला श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.
जर का या मूर्ती तुटल्या तर ते शुभ की अशुभ चला जाणून घेऊया.
हिंदू धर्मात मूर्ती म्हणजे फक्त एक दगड किंवा चित्रे नसून त्यामध्ये देव देवता राहतात असे मानले जाते.
अनेक मान्यतेनुसार मूर्ती तुटणे हे घरात नकारात्मक ऊर्जा आणि अशांततेचे लक्षण मानले जाते.
काही धार्मिक विद्वानांचा असा विश्वास आहे की, मूर्ती तुटल्याने जुन्या नकारात्मक ऊर्जेचा अंत आणि नवीन सुरुवात होते.
मूर्ती चुकून तुटली तर ती सामान्य घटना मानली जाते. मात्र जाणून बुजून ती तोडणे अशुभ ठरू शकते.
घरात तुटलेली मूर्ती ठेवू नये. ती लगेचच नदी किंवा पवित्र पाण्यात विसर्जित करावी.
मूर्ती तुटल्यास तुम्ही त्या ठिकाणी हवन करू शकता किंवा मंत्राचा जप करू शकता. तसेच पूजा स्थळ ईशान्य दिशेला ठेवावे.