Saam Tv
येत्या बुधवारी म्हणजेच 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया मोठ्या संख्येने साजरा करतात.
हिंदू धर्मानुसार या दिवशी केलेले दान, पूजा आणि गुंतवणूक याने आयुष्यात कसलीच कमी भासत नाही.
काही माणसे खूप आर्थिक अडचणीत किंवा खूप कर्जात असतील तर तुम्ही पुढील ३ उपाय अक्षय्य तृतीयेला नक्की करू शकता.
अक्षय्य तृतीयेला सकाळी ५.४० ते १२.१८ या मुहूर्तावर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करा.
तुम्ही ही पूजा करताना नारळ, चंदन, तांदूळ, सुपारी, दुर्वा, नारळ आणि प्रसादासाठी मिठाई यांचा समावेश करा.
पूजेनंतर नारळ लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवा. नारळ हे देवीचे प्रतिक मानले जाते.
अक्षय्य तृतीये जितक्या गोष्टी दान कराल तितके तुमच्या आयुष्यात धन प्राप्त होईल.
अन्न, कपडे, पैसे किंवा शिक्षणसामग्री तुम्ही गरजूंना दान करू शकता.
तुमच्या आर्थिक अडचणी असे केल्याने नक्कीच दूर होतीस. या दिवशी जे काही कार्य कराल ते पुण्याचे करा.