Manasvi Choudhary
लग्नाआधीची भेट ही प्रत्येक मुलगा व मुलीसाठी खास क्षण असतो तुम्हालाही कधी असा प्रश्न पडलाय का? लग्नाआधी तुमच्या होणाऱ्या पार्टनरसोबत नेमकं काय बोलावे?
तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा जीवनसाथी करणार आहात त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे.
पण तुम्हाला जर नेमकं काय बोलावे हे समजत नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर लग्न जुळले असेल तर तुम्ही त्याला लग्न का करत आहेस? कोणाचा दबाव नाही ना ? असा प्रश्न विचारा.
तुम्ही होणाऱ्या पार्टनरला त्याच्या आवडी- निवडीविषयी विचारा तुमच्या आवडी निवडीबद्दल सांगा.
पार्टनरसोबत भविष्याबद्दलची चर्चा करा. दोघांचेही स्वप्न आणि ध्येय काय आहेत हे जाणून घ्या.
लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल या विषयी चर्चा करा काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अरेंज मॅरेंज असेल तर, लग्नापूर्वीच जोडीदारांशी चांगली मैत्री करण्याचा प्रयत्न करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.