Manasvi Choudhary
घेवड्याची सुकी भाजी खायला अत्यंत रूचकर लागते. घरोघरी घेवड्याची भाजी बनवली जाते.घेवड्याच्या भाजीला वालपापडी असे देखील म्हणतात. इंग्रजीमध्ये या भाजी Flat Beans या नावाने ओळखले जाते.
गावरान स्टाईल घेवड्याची सुकी भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.
घेवड्याची भाजी बनवण्यासाठी घेवडा, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कांदा, लसूण, हळद, मसाला, सुकं खोबरे, शेंगदाणा कूट, गूळ, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
घेवड्याची भाजी बनवण्यासाठी घेवड्याच्या शेंगा सर्वात आधी सोलून घ्या यानंतर घेवड्याच्या भाजीचे तुकडे करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ताची फोडणी द्या नंतर यामध्ये ठेचलेला लसूण परतून घ्या.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांदा परतल्यानंतर यात घेवड्याचे तुकडे मिक्स करा. नंतर यात हळद, लाल मसाला आणि मीठ हे मसाले घाला.
मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर कढईला झाकण लावून भाजी शिजवून द्या. अशाप्रकारे तुमची चमचमीत गावरान स्टाईल घेवड्याची भाजी तयार होईल.